The state minister put a smile on the face of the disabled : दिव्यांगांना व्हीलचेअरसह अन्य साहित्याची भेट
Wardha : दिव्यांग बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता, त्यांच्याकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. दिव्यांगांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याकरिता कसरत करावी लागते. त्यामुळे त्यांचे अवागमन सुकर व्हावे, या उद्देशाने राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी २५ दिव्यांगांना व्हीलचेअरसह अन्य साहित्याची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
जिल्हा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य संजय जाधव व दिव्यांग मित्र परिवार, एलमको व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांना त्यांच्या गरजेचे साहित्य राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामध्ये २५ दिव्यांगांना व्हीलचेअर, अंध दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक सुगम्य काठी दिली. तर अन्य दिव्यांगांना त्यांना उपयोगात पडणारे साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी एलमकोचे अधिकारी रुद्र चोपडे, जिल्हा परिषद समाज कल्याण दिव्यांग विभागाच्या प्रमुख सोनाली शिंदे, भोजराज पाटील, डॉ. खोडे यांची उपस्थिती होती.
Bazar Samiti Administrator’s Fraud : भ्रष्टाचाराचा कळस! नाला अस्तित्वातच नाही, तरीही खर्च दाखवला!
डॉ. पंकज भोयर यांनी दिव्यांगांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांची दिव्यांगांसोबतच आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. समाजातील दुर्लक्षित असलेल्या या घटकासोबत डॉ. भोयर यांनी आपलेपणाची भावना जोपासली आहे.
मागील दहा वर्षांपासून ते दिव्यांगांसोबत जन्मदिवस साजरा करतात. आता मंत्रिपद मिळाल्यावरही त्यांनी हा जिव्हाळा कायम ठेवल्याने दिव्यांगांनीही कृतज्ञता व्यक्त केली. तसेच दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे अभिवचन यावेळी राज्यमंत्री भोयर यांनी दिव्यांगांना दिले.