Breaking

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादीला फायदा होणार?

NCP leader will review the election preparations : नागपुरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे नागपुरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचा महापालिका निवडणुकीत किती फायदा होणार, हे वेळच सांगेल.

आगामी महानगरपालिका निवडणूकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून अद्याप कुठलेही पत्ते उघड करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या पक्षाकडून संघटन मजबूतीवर भर देत वेळ पडली तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट) तयारी लागला आहे. सुप्रिया सुळे नागपुरात येऊन संघटनेचा आढावा घेणार आहेत.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितमध्ये नव्या गड्याकडे जबाबदारी; नेतृत्व बदलले

राष्ट्रवादीचे शहरात हवे तसे अस्तित्व निर्माण झालेले नाही. पक्षात फूट पडल्यापासून तर आव्हाने आणखी वाढली आहेत. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त अशी स्थिती आहे. अशा स्थितीत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची जबाबदारी घेतली आहे. त्या शनिवारी मुंबईहून नागपुरात पोहोचतील. त्यानंतर सकाळी ८ वाजता दीक्षाभूमी येथे भेट देतील.

सकाळी नऊ वाजता त्या पक्षाच्या नागपूर शहर व ग्रामीणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत रवीभवन येथे संवाद साधतील. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चेचा भर असले. त्यानंतर त्यांची पत्रपरिषददेखील आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२.३० वाजता त्या झिकॉन तर्फे आयोजीत कार्यक्रमास उपस्थित राहतील.

Pune Railway station : पुणे रेल्वे स्टेशनला पेशव्यांचे नाव देण्याचा वाद तापला

राष्ट्रवादीसमोर मागील काही काळापासून आव्हाने वाढली आहे. शरद पवार राजकारणात असले तरी त्यांचे जास्त दौरे होत नसल्याचे वास्तव आहे. अनिल देशमुख वगळता एकही मोठा नेता पक्षाकडे सद्यस्थितीत नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येदेखील आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. विधानसभेत याचे प्रतिबिंब उमटले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या माध्यमातून पक्षात परत उर्जा निर्माण करण्याची मोठी जबाबदारी सुळे यांच्या खांद्यावर आहे.