Why did the NCP leader say that Devendra Fadnavis is more experienced than me? : आम्ही लोकशाहीवादी, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार
Nagpur : मराठमोळ्या महाराष्ट्रात महायुती सरकारने हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे राज्यभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. एक महायुतीमधील तीन पक्ष सोडले, तर इतर सर्व राजकीय पक्ष या सक्तीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान हा निर्णय महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच काळात घेण्यात आला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या आज (ता. २८ जून) नागपुरात आल्या असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारने नव्हे तर माशेलकर आणि सुखदेव थोरात यांच्या समितीने ती शिफारस केली होती. पण या प्रकारच्या समित्या या निर्णय घेण्यासाठी नसतात, त्या फक्त शिफारसी देण्यासाठी असतात, us देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे. कारण सत्तेत आणि प्रशासनात काम करण्याचा त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे.
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंची फडणवीसांविरोधात मोठी तक्रार !
मी ‘वन नेशन – वन इलेक्शन’ समितीवर आहे. पण आमचं सांगणं किंवा शिफारस म्हणजे निर्णय नसतो. तर आम्ही माहिती घेऊन फक्त शिफारस करतो. निर्णय घेण्याची प्रक्रिया सरकार करते. आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि सशक्त लोकशाहीत प्रत्येकाल बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही बोलण्याचा अधिकार आहेच. पण शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पालकांनी मिळूनच घ्यायला हवा, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Bacchu Kadu : एकल महिलांचा हक्कासाठी एल्गार; १४ जुलैला विदर्भस्तरीय मंथन
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात विचारले असता, भाजपमध्ये जाण्यासाठी कुणी अॅडमिशन मागितीली आहे का, असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. त्या म्हणाल्या कुणी मागणी केलीच नसेल तर त्यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, असेही त्या म्हणाल्या.