Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुलच्या बस आगाराच्या निर्मितीला मिळाली गती, मुनगंटीवारांच्या प्रयत्नांचे फलीत !

Efforts of BJP leader Sudhir Mungantiwar and instructions given by Shiv Sena leader Transport Minister Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले सकारात्मक निर्देश

Mumbai : आपल्या सातत्यापूर्ण कामगिरीने चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवणारे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथील बस आगार निर्मितीचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी त्यांनी सातत्यापूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले अन् परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल (७ जुलै) विधानभवनात या विषयावर महत्वपूर्ण बैठक धेतली आणि या कामाला गती मिळाली.

मुल शहरात बस आगाराचे काम मंजूर होते. पण या कामाला गती मिळत नव्हती. काल झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना सकारात्मक निर्देश दिले. या बैठकीला उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुशेकर, बांधकाम विभागाचे जनरल मॅनेजर दिनेश महाजन, वाहतूक व्यवस्थापक नितीन मैंद आदींची उपस्थिती होती.

Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसलय !

बैठकीत मुल बस आगारासंबंधी रखडलेली कामे, जागेची अंमलबजावणी, कार्यान्वयातील अडथळे आणि विभागीय समन्वय या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुल बस आगाराचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले. मूल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या आगार प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत.