Dharmaraobaba Atram : मी १०० टक्के मंत्री होणार, धर्मरावबाबांना विश्वास !

Efforts are underway to keep the Zilla Parishad elections in hand said Dharmaraobaba Atram : जिल्हा परिषद निवडणूक हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू

Gadchiroli Politics : देवेंद्र फडणविस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा आहे. कारण पूर्वी ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यात काही कामांचे भूमीपूजन केले. आता ते गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यास मानयनिंग हब होण्यास फायदा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आत्राम यांना विचारले असता, गडचिरोलीची जवाबदारी माझ्यावर आहेच. त्यासाठी पक्ष बांधणी करणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याबद्दल विचारलें असता, त्यांच्यावर मी काही जास्त प्रतिक्रिया देणार नाही. कारण त्यांना रोज काही ना काही टीव्ही समोर बोलायचं असते, असे ते म्हणाले.

Ajit Pawar will ask Dhananjay Munde to resign : ..तर अजित पवार घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा !

दोन्ही पवार एकत्र आल्यास मोठी क्रांती
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात एक प्रकारची क्रांती होईल. राजकारणात राजी-नाराजी चालत असते. शरद पवार यांच्या जन्मदिवसाला अजित दादा यांनी शरद पवारांची भेट घेतली. अजित दादाच्या आईनेसुद्धा त्यात साखर घातली. त्यादिवशी एकत्र यायला पाहिजे होतं. खासदार आणि आमदारांनी विरोधात राहून विकास होत नाही. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं, याचा पुनरुच्चार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला.

मी १०० टक्के मंत्री होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा हा तरूण चेहरा पुन्हा राज्याला मिळालेला आहे. मागील दीड वर्षात चांगल्या पद्धतीचा विकास झाला. राजकारणात सर्वच शक्य आहे, याचा विचार शरद पवारांनी केला पाहिजे. छगन भुजबळ यांच्याबाबतीत प्रश्न विचारला असता, त्या दिवशी शरद पवार आणि भुजबळ यांच्यात काय झालं, ते आम्हालाही कळलं नाही.

Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !

मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज होणं स्वाभाविक आहे. मी अजित दादांसोबत मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. अडीच वर्ष थांबायचं आहे. वाट पाहत आहो. मी शंभर टक्के मंत्री होणार, मंत्री बनणे माझ्या नशिबात आहे. चार वेळा निवडून आलो चारही वेळा मंत्री झालो आता ही मी मंत्री होणार, असा विश्वास धर्मरावबाबांनी व्यक्त केला.