Eknath Shinde warned Sanjay Shirsat and Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट, संजय गायकवाड यांचे कान टोचले
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज आहेत अशी चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची चर्चा आहे. यात शिवसेनेचे दोन्ही संजय चांगलेच वादात सापडले आहेत. संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये मॅनेजरला मारहाण केली. तर मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांचे बंडल असलेल्या बॅगेसह एक व्हिडीओ समोर आला. दोन्ही प्रकरणानंतर राजकारणा खळबळ उडाली.आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणानंतर संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे एकनाथ शिंदेंनी कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री आणि आमदारांच्या वेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद शिंदेंनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात सापडलेत. गेल्या तीन दिवसांत शिंदेंच्या तीन मंत्र्यांनी आपल्या कारनाम्यांनी सरकारमध्ये शिंदेंची कोंडी केली. संजय गाकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये गुंडगिरी केली. त्यानंतर शंभूराज देसाईंनी भर सभागृहात शिवराळ भाषा वापरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना धमकी दिली. आणि त्याचवेळी आधी आयकर विभागाच्या नोटीशीमुळे आणि दुसऱ्या दिवशी नोटांच्या बंडलाच्या व्हिडीओमुळे शिरसाट अडचणीत आले.
आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं. त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात ‘मला विष खायला घालतो का’ असं विचारलं आणि कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला वास घ्यायला लावला आणि गायकवाड यांनी त्याला मारहाण केली.
संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. यात संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं दिसत आहे. तर एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला होता.