Breaking

Farmers of Vidarbha : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय ड्रोन !

The use of drones is a boon for : शेतकरी, युवकांना मिळणार प्रशिक्षणाची संधी

Buldhana केंद्र व राज्य शासनाच्या ड्रोन प्रशिक्षण योजनेची अंमलवजावणी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने बुलढाण्यात सुरु करण्यात आलेल्या ड्रोन तंत्रज्ञान कंपनी कॉनफ्लाय डायनॅमिक्स प्रा. लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच झाले. या कॉनफ्लाय डायनॅमिक्स कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकरी, युवकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ड्रोनचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पाटील यांनी व्यक्त केला.

ड्रोनचे प्रशिक्षण, देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कॉनफ्लाय डायनॅमिक्सने बुलडाण्यात प्रादेशिक कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश विटोडे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कस्तुरे, मारुत ड्रोनटेकचे राष्ट्रीय फ्रँचायझी प्रमुख, संजय पाल, तसेच जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कारागीर उपस्थित होते.

ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात वापर करण्यावर भर दिला. त्यांनी ड्रोनचा उपयोग कीटकनाशक फवारणी, निरीक्षण आणि कृषी क्षेत्रातील इतर उपक्रमांसाठी वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

Nagpur Improvement Trust : नागपुरातील शिवसृष्टी प्रकल्प रखडला !

यावेळी कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे सीईओ, कुणाल कस्तुरे यांनी प्रादेशिक कार्यालयातून सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यात एनएसडीसी किसान ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोनच्या प्रगत उपयोगाची माहिती मिळेल. दुरुस्ती आणि देखभाल प्रशिक्षण हे जे हैदराबादस्थित आघाडीच्या ड्रोन उत्पादन कंपनी मारुत ड्रोनटेकच्या सहकार्याने फ्रँचायझी स्वरूपात उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले.

Women unsafe in Nagpur, Nagpur Police : महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !

कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे आगामी काळात प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन, आणि ड्रोन उत्पादनावर भर असणार आहे. स्थानिक तांत्रिक संस्थांना ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स आणि कौशल्य विकास कार्यक्रम स्थापन करण्यात मदत करणार असल्याचे सांगितले. याची दखल घेत जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम, उद्योग सुरु करण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.