Shikshak Sahakari Bank : शिक्षक बँकेच्या चाचणी अंकेक्षणाला सुरुवात; संचालकांची धावपळ!

Investigation into several irregularities scams underway : कर्ज पुनर्गठन, गहाळ धनादेश, इनोव्हा घोटाळ्यांसह अनेक अनियमिततांचा तपास सुरू

Amravati शिक्षक सहकारी बँकेच्या चाचणी अंकेक्षणास प्रारंभ झाल्यानंतर संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विविध शाखांमधील कर्जवाटप, थकीत कर्जांचे पुनर्गठन, इनोव्हा गाडीचा घोटाळा, आणि दोन कोटी रुपयांचा गहाळ धनादेश अशा अनेक गंभीर प्रकरणांची आता शासकीय ऑडिटर तपासणी करत आहेत.

मोर्शी आणि चांदूरबाजार शाखांमध्ये ऑडिटच्या टीमने गेल्या काही दिवसांत झडती घेतली असून, इतर तालुक्यांमध्येही लवकरच ऑडिटर पोहोचणार असल्याचे संकेत आहेत.

मुख्य मुद्दे काय?

थकीत कर्जदारांना अतिरिक्त कर्ज देऊन ‘पुनर्गठन’; एनपीए वाढण्याची शक्यता
कर्ज वाटपात योग्य कागदपत्रे, इन्कम-लोन रेशोची पडताळणी झाली का?
सदस्यांना कर्ज देताना इतर बँकांचे थकीत कर्ज तपासले गेले का?
२ कोटींचा गहाळ धनादेश प्रकरण अतिशय गंभीर, काहींवर गुन्हे दाखल, मात्र काहींना वाचवले गेले
‘इनोव्हा प्रकरण’ – बँकेसाठी घेतलेली लक्झरी गाडी डॉक्टरच्या नावावर?

Parliament Monsoon Session : ‘ ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने ध्येय गाठले’

ऑडिट थांबवण्यासाठी प्रयत्न

चाचणी अंकेक्षण सुरू होताच, संचालकांनी ऑडिट थांबवण्यासाठी शासकीय व राजकीय संपर्क सुरू केला आहे. सहकार मंत्र्याकडे ‘स्टे’ मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. आता बँक उच्च न्यायालयात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut : भाजपने ‘हनी ट्रॅप’ लावून महाविकास आघाडी सरकार पाडले !

संचालकांकडून चाचणी अंकेक्षणाला विरोध का केला जात आहे, हेच सर्वसामान्य सभासदांच्या शंकेचा विषय बनला आहे.
“ऑडिट नको म्हणणे म्हणजे मोठ्या घोटाळ्यांचे संकेत?” असा थेट सवाल सहकार क्षेत्रात उपस्थित होतोय.