Bachhu kadu: प्रहार संघटनेचे राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

Bachchu Kadu aggressive, says Gandhigiri is over, Bhagat Singhgiri continues : बच्चू कडू आक्रमक, म्हणाले गांधीगिरी संपली, भगतसिंग गिरी सुरू

Paratwada : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज राज्यभर शेतकरी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आले. परतवाडा येथे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलनाची सुरुवात झाली. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रहार कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परतवाडा-अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. राज्यभरात नागपूर पुणे सह विविध ठिकाणी हे आंदोलन होत आहे.

बच्चू कडूंनी सरकारवर टीका करताना सांगितले की, गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. तुम्हाला कर्जमाफी द्यावीच लागेल. त्यांनी सांगितले की, सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कृषीमंत्री विधानभवनात रमी खेळत असताना तरुण मात्र आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Sanjay Raut : त्यांनी महाराष्ट्राचं स्मशान केलं हा तर सदोष मनुष्यवध !

पुढील आंदोलन 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी होणार असल्याची घोषणा बच्चू कडूंनी केली. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन झाले असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून बंदोबस्त वाढवला आहे.

बच्चू कडूंनी याआधी उपोषण केले होते. सरकारच्या सकारात्मक प्रतिसादनंतर हे आंदोलन तात्पुरती स्थगित केले. नंतर पदयात्रा काढून लोकांच्या समस्या ऐकल्या. सरकारकडून फक्त आश्वासने मिळत आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आंदोलनाची सुरुवात झाली. रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे. हजारो शेतकरी, दिव्यांग कामगार आणि प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परतवाडा-अमरावती महामार्ग पूर्णतः बंद झाला. आता आम्ही तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. आत्महत्या नको, लढा द्या असे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले. हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है.

Nishikant Dubey : ‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्याचा जाब विचारला

कृषीमंत्री विधानभवनात रमी खेळतात, आणि युवक त्या नादात मरण पावतात. असे त्यांनी म्हटले आहे.सरकारने अशांतता पेरण्याचा डाव रचला आहे, कर्जमाफी न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार. 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधीजवळ आंदोलन होणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.