Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : धक्कादायक : PKV च्या ‘रुम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे’

New controversy over posting of ‘Rooms available for rent’ sign board : कुलगुरूंच्या शासकीय निवासस्थानासमोरच लावला बोर्ड

Nagpur : शासकीय मालमत्तेचा दुरूपयोग ही बाब काही नवीन राहिलेली नाही. यामध्येही लोक नवनवीन शक्कल लढवत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या येथील शासकीय निवासस्थानासममोर ‘रुम्प भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत’, असा मजकूर असलेला बोर्ड लावण्यात आलेला आहे. यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे शासकीय निवासस्थान अकोला आणि नागपूर येथे आहे. नागपुरात बजाज नगर परिसरात हे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या शेजारीच विद्यापीठाचे गेस्ट हाऊस आहे. हे गेस्ट हाऊस ‘दहितर हॉस्पिटॅलिटी’ या खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. या कंपनीने हद्दच केली. चक्क गेस्ट हाऊच्या खोल्याच भाड्याने देण्यासाठी काढल्या. ‘गुपचुप – चिडीचुप’ हा प्रकार केला असता तर वादंग निर्माण झाला नसता. पण थेट कुलगुरूंच्या निवासस्थानासमोरच ‘रुम्प भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत’, असा मजकूर असलेला बोर्ड लावल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Maharashtra politics : 90 हजार कोटींच्या थकबाकीचा पहिला बळी आहे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गेस्ट हाऊसच्या ११ खोल्या खासगी कंपनीला वार्षिक ११ लाख रुपयांच्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची संख्या मंदावली आहे. पूर्वी येथे वर्ग चारचे ४०० कर्मचारी होते. आता फक्त ८० कर्मचारी उरले आहेत. त्यामुळे हे गेस्ट हाऊस चालवणे शक्य नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच हे गेस्ट हाऊस खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. या कंपनीने या गेस्ट हाऊसचा असा वापर केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.