Ladki Bahil scheme is not a problem, but a responsibility : ‘लाडकी बहीण’ योजना समस्या नाही तर जबाबदारी
Nagpur : आजपर्यंत राज्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना. महायुतीचे सरकार अस्तित्वात येण्यासाठी या योजनेची भूमिका महत्वाची ठरली. पण नंतर या योजनेवर विरोधी पक्षाकडून वारंवार टिका करण्यात आली. आताही या योजनेवरून सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी विरोधी पक्षनेते सोडत नाही. येवढेच काय तर अर्थतज्ज्ञही या योजनेवर टिका करतात. एका चर्चेत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका झटक्यात विरोधी पक्ष आणि तथाकथित अर्थतज्ज्ञाांचे आरोप खोडून काढले.
एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत आमदार मुनगंटीवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्थकारण स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले, विरोधक म्हणतात पण सरकारने या योजनेला कधीच समस्या समजलेलेच नाहीये. संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या सरकारची ही जबाबदारी आहे. एमएमआरडीए अंतर्गत ११ लाख कोटींची कामे करताना कुणालाही अडचण होत नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून २३४ किलोमीटर मेट्रोची कामे करतानाही कुणाला अडचण झाली नाही. दरवर्षी ८ लाख सरकारी कर्मचारी आणि इतर सर्व मिळून १७ लाख कर्मचाऱ्यांचा आठ-आठ हजार कोटींचा डीए दरवर्षी वाढवण्यामध्ये कुणालाही अडचण नाही. मग लाडक्या बहीणींना पैसे देताना काही लोकांची पोटदुखी का होते आहे?
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !
२ कोटी ४४ लाख बहीणींच्या खात्यात पैसे जमा करताना कुणालाही कुठलीही अडचण नसावी. आमच्या ज्या बहीणी हलाखीचे जीवन जगत आहेत, त्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. . अर्थसंकल्पात दरवर्षी जवळपास ४५ हजार कोटीची वाढ होते आहे. त्यामुळे आणखी एक योजना चालवणे सरकारसाठी जड नाही. मुलांवर संकट आले तर आईसुद्धा आपली पूर्ण क्षमता पणाला लावते.
मुलांना वेदना होऊ देत नाही. सरकारही या योजनेच्या माध्यमातून हलाखीत जीवन जगत असलेल्या लोकांना दिलासा देत आहे. पण या योजनेबाबत तथाकथित अर्थतज्ज्ञांच्या मनात दुरावा का आहे, हे कऱत नाही, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
या योजनेमुळे राज्य संकटात येत आहे, असे वाटत असल्यास आमदारांचे, मंत्र्यांचे पगार कमी करा, पेन्शन कमी करा, बंगल्यांवरचे खर्च कमी करा. पण योजना बंद करू नका. २ कोटी ४४ लाख पेक्षा जास्त बहीणींच्या खात्यात २६ ते २९ हजार कोटी रुपये जात आहेत. आजही ९९ हजार कोटींचे क्लेम पडले आहेत, ते मार्गी लवण्यासाठी प्रयत्न करायचा नाही. आपल्याकडे ३५० आयएएस अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांच्या बुद्धीमतेचा वापर करायचा नाही, असे कुणाला का वाटते, असा प्रश्नही आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
Maharashtra politics : पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता !
आम्ही भाऊबीजेला बहीणींच्या खात्यात पैसे टाकले. योजनेसाठी पैसे कमी पडत असल्यास अधिक पैसे मिळवण्याचे मार्ग शोधावे. अदानी, अंबानी कडे ३५० आयएएस अधिकाऱ्यांची फौज नाही, ती सरकारजवळ आहे. राज्य चालवण्याचा अधिकार जनतेने दिला आहे. मी अर्थमंत्री असताना ११ हजार ९९५ कोटी रुपयांचा सरप्लस अर्थसंकल्प दिला होता. त्यानंतर कुणीही असा अर्थसंकल्प सादर करू शकलेले नाही, हेसुद्धा आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले. आपल्याकडे ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, नद्या, खनिज संपत्ती आहे. जीएसटीमध्ये मोठा हिस्सा महाराष्ट्र देतो. असे असताना एका योजनेच्या मागे अर्थतज्ज्ञ का लागले, हे माहिती नाही, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.