Chhatrapati Shivaji Maharaj is different from all kings : शिवेंद्रराजेंनी घेतली सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात भेट
Chandrapur : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात येताच त्यांनी सर्वप्रथम राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि तमाम चंद्रपूरकरांच्यावतीने बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे हृदयपूर्वक स्वागत केले.
याप्रसंगी राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, माजी महानगर अध्यक्ष राहूल पावडे तसेच भाजपा महानगर व ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री शिवेंद्रराजे यांचे स्वागत केल्यानंतर आमदार मुनगंटीवार म्हणाले, शिवेंद्रराजे यांच्या नम्रतेचे मोठे उदाहरण म्हणजे त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आला तेव्हा ‘पहीली भेट सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी’, असा उल्लेख होता. हे बघून मी भारावून गेलो. आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं, हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी एका झटक्यात खोडून काढले तथाकथित अर्थतज्ज्ञांचे आरोप !
शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. महाराजांच्या १३व्या पिढीचा वारसा चालवणारे आहेत. आपण मावळे म्हणून १३व्या पिढीतील शिवभक्त आहोत. ते आमच्या घरी आल्यामुळे आज अत्यानंद झाला. आपसूक ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष निघत होता. या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की, एक बेशुद्ध व्यक्तीसुद्धा शुद्धीवर येईल. १२ गडकिल्ले युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी इतर देशातील लोक बैठकीत बसले होते. तेव्हा आम्ही छत्रपतींचे वैशिष्ट्य सांगितले. आजवर झालेल्या सर्व राजा महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने वेगळे राजे होऊन गेले. कारण सर्व राजे ‘हे माझे राज्य आहे..’, असे म्हणायचे. पण छत्रपती शिवराय म्हणायचे की ‘हे रयतेचे राज्य आहे..’, असे सांगणारा आणि माननारा हा एकच राजा होऊन गेला, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.
छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला आहे. यासाठी आम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते. छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवरील मातीचा कण अन् कण जगातल्या कुठल्याही धातुपेक्षा महागडा आहे. कारण धातुपासून महागड्या वस्तू बनवता येतील. पण या मातीच्या कणाकणांतून माणूस घडवता येतो. या मातीची किंमत केवळ भारत देशच नाही, तर जगातील सर्वच देश मानतात. आता तर दरवर्षी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सरकारच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराजांनी ज्या वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनख लंडनच्या व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझीअमने आपल्याला तीन वर्षांसाठी दिले आहेत. वाघनख येथेच कायम रहावे, हा आपला पुढचा प्रयत्न असणार आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !
शिवसृष्टी साकारतेय..
शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे महत्वाचे खाते आहे.शिवेंद्रराजे यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत विकास साधायचा आहेत. छत्रपतींच्या मातोश्री आपल्या विदर्भाच्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर आहे. आजही तेथे त्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. तेथे भव्य शिवसृष्टी उभारली जाते आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.