MLAs inspect school autorickshaw : आमदार उतरले रस्त्यावर, शाळेच्या ऑटोरिक्षाची केली तपासणी
Akola शहरातील एका रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना एका ऑटोरिक्षामध्ये १२ ते १५ च्या संख्येने भरून नेताना पाहून आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत रिक्षाचालकाला थांबवले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर व धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
रिक्षाचालकाकडे कोणतीही अधिकृत शाळा परवानगी, ओळखपत्रे किंवा वाहतुकीची कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. यावर आमदार मिटकरी यांनी तत्काळ ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली तसेच पोलिस अधीक्षक अकोला यांना लेखी पत्राद्वारे कारवाईसाठी सूचित केले.
Malegao case result : ‘हिंदू दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हला न्यायालयाची चपराक’
या पार्श्वभूमीवर, अकोला जिल्ह्यातील पोलिस, शिक्षण विभाग, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाणार असून, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील बेपर्वाई थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात येणार आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले : “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. शाळेच्या वाहन व्यवस्थापनात शिस्त आणि कायद्याचे पालन हे अनिवार्य आहे.अशा प्रकारच्या बेपर्वा वाहतुकीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
Manikrao Kokate : माणिकराव शिवारातून बाहेर… पण ‘मैदाना’त कायम?
पालकांचं लक्ष नाही का?
आपले पाल्य रोज शाळेत जाताना जीवघेणा प्रवास करतात, याकडे पालकांचे लक्ष नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतो. आपली मुलं ज्या ऑटोरिक्षात जात आहेत, त्यात किती मुलं बसतात, १२ ते १५ मुलांना छोट्याशा ऑटोरिक्षात कोंबताना मुलांना त्रास होत नाही का, यासंदर्भात पालकांनीही सजग असणे गरजेचे आहे, असा सूर आता उमटत आहे.