Breaking

Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही

Discussions come to a halt due to Chief Minister Fadnavis clear stance : मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चांना विराम

Nagpur : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, कृषी खाते त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार देण्यात आला आहे, तर कोकाटेंना क्रीडा आणि युवक कल्याण खाते सोपवण्यात आले आहे.
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा खातेबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

फडणवीस म्हणाले, जी काही घटना घडली त्यानंतर जनतेमध्ये मोठा रोष होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मी मिळून चर्चा केली आणि त्यानंतर कोकाटे यांचं खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे कोणीही बेशिस्त वर्तन केल्यास ते सरकारकडून खपवून घेतले जाणार नाही. आम्ही इथे जनतेची सेवा करण्यासाठी आहोत आणि त्या सेवेच्या भूमिकेतून मंत्र्यांनी जबाबदारीने वागायला हवे.

Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले होते. कोकाटेंच्या जागी पुन्हा धनंजय मुंडेंना कृषी खाते मिळणार का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे.

“तुमची माहिती अर्धवट आहे. धनंजय मुंडे यांनी तीन वेळा माझी भेट घेतली खरी, पण त्या प्रत्येक भेटीचं कारण वेगळं होतं. या कोणत्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत एकही चर्चा झाली नाही, ” असं स्पष्ट करत फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. ती चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे मिळून करतो.”

Datta Bharne : अखेर खांदेपालट झालेच, कृषीखाते दत्ता भरणेंकडे

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, सध्या फक्त कृषी खात्याबाबत निर्णय झाला आहे. याशिवाय इतर कोणत्याही खात्यात बदल होणार असल्याची कोणतीही चर्चा सध्या नाही. राजकीय वर्तुळात मात्र धनंजय मुंडे यांच्या “कमबॅक”बाबत चर्चा थांबलेल्या नाहीत. तरीही मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्ट भूमिकेमुळे सध्या तरी या चर्चांना थांबवण्यात सरकारला यश आलं आहे.