Breaking

Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा

Birthday celebration celebrated with charitable activities across Chandrapur district : रंजल्या गांजल्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचा दिला सेवामंत्र

Chandrapur : राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या ३०-३५ वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. आमदारकीची ही त्यांची सातवी टर्म आहे. हा विक्रम त्यांनी रचला. ‘विकास पुरूष’, ‘सद्हृदयी नेता’, ‘दिला शब्द केला पूर्ण’, ही बिरूदे जनतेने त्यांना दिलेली आहे. अशा या संवेदनशील नेत्याचा वाढदिवस त्यांच्या लाडक्या जनतेने जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा केला. केवळ पोकळ जाहिरातबाजी, फलकबाजी न करता जिल्हाभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी ३० जुलैला सुधीर मुनगंटीवार विचार मंचद्वारा घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्र, ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंढकी आणि वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात आले. रंजल्या गांजल्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचा सेवामंत्र आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना दिला. त्यानुसार कार्यकर्त्यांनी राजुरा येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केले. या शिबिरात ४३६४ नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आली. यामध्ये ५०३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. तशी व्यवस्था करून देण्यात आली.

Rajendra Raut : तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटला, तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते?

आमदार मुनगंटीवारांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूरमध्ये वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आणि शहराध्यक्ष रणंजय सिंह यांच्या नेतृत्वात शहरातील विविध मंदिरांमध्ये त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि पूजा अर्चना करण्यात आली. सोबत फळवाटप, साहित्यवाटप आणि अन्नदान करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा, यशवंतनगर (पडोली) येथे आयोजित समाजोपयोगी उपक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नोटबुक, ज्येष्ठ नागरिकांना आधारकाठी आणि गरजू विधवा महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. समाजातील विविध घटकांसाठी सन्मान व सहकार्याचे प्रतीक ठरलेला हा उपक्रम, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सेवाभावी कार्याचा प्रत्यय देणारा ठरला.

मुल येथे सकाळी मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. गणेश मंदिरात भजन, पूजन तसेच महाआरती करण्यात आली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे मित्रपरिवारातर्फे गांधी चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अपंग विद्यालयात विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणाचा पाया जनसेवेने बांधला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी जनसेवेचे विविध उपक्रम त्यांच्या चाहत्यांनी राबवले. चंद्रपूर शहरात सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराचे संयोजक राहुल पावडे यांच्या नेतृत्वात भव्य रोगनिदान आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. याशिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, हनुमान मंदिरात सुंदरकांड, पतंजली योग प्रशिक्षण शिबिर, ब्लॅंकेट वाटप, ताडपत्री वाटप, निबंध स्पर्धा, रेनकोट वाटप, अन्नदान आदी कार्यक्रम राबवण्यात आले.

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व डॉक्टरांनी उभे राहून आमदार मुनगंटीवार यांना सन्मान दिला. हा क्षण अनुभवताना आमदार मुनगंटीवार भारावून गेले होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रितेश दिक्षित, सचिव डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. मोनिका कोतपल्लीवार आणि भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Hinjewadi IT Park : आयटीवाल्यांचं ऐकतात, आम्हाला गृहीत धरता !

चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात माता कन्यका परमेश्र्वरी देवी मंदिरात महाआरती, मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सुभद्राबाई सांगडा पाटील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वितरण, महिला सफाई कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेट, बेडशीट व जीवनावश्यक वस्तुंचे वापट स्ट्रीट वेंडर्स व तीन चाकी रीक्षाचालकांना रेनकोट वाटप आदी कार्यक्रम राबवण्यात आले. चंद्रपूरच्या बंगाली कॅम्पमध्ये जिल्ह्यातील कामगार बांधवांसाठी धनुर्वात TT प्रतिबंधक शिबिर घेण्यात आले. यामध्ये शेकडो कामगारांना ही लस देण्यात आली. एकंदरीत जिल्हाभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले. हा वाढदिवस जिल्ह्यातील नागरिकांना आनंद तसेच आमदार मुनगंटीवार यांना नवी ऊर्जा देऊन गेला.