Buldhana businessman joins Uddhav Thackeray’s Shiv Sena : ‘मातोश्री’वर अधिकृत प्रवेश; स्थानिव निवडणुकांपूर्वी मोठे बळ
Buldhana बुलढाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात उद्योजक अनिल नरोटे यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतला.
या वेळी माजी खासदार आणि शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते अनिल नरोटे यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश पूर्णत्वास गेला. कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, उपनेते नितीन बानुगडे पाटील, प्रवक्त्या जयश्री शेळके, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तसेच कृष्णा बुधवत व गोविंद दळवी यांचीही उपस्थिती होती.
Sanatani Terrorism : ‘ सनातनी दहशतवाद’ वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला !
अनिल नरोटे हे शेतीमातीशी नाते जपणाऱ्या कुटुंबातून असून, विविध शेतकरी प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या चळवळीत ते सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची ठसा उमठवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कालावधीत कोरोनाकाळातील प्रभावी नेतृत्व, दोन लाखांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी, तसेच समन्वयक भूमिकेचा प्रभाव त्यांच्या निर्णयामागे असल्याचे नरोटे यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.
Village development : भगत हेटी गावाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकास कामांना उभारी
नुकत्याच पार पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुलढाणा मेळाव्यात अनिल नरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मातोश्री भेटीनंतर त्यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर बुलढाण्यातील राजकीय समीकरणे अधिक गडद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.








