Breaking

Bachchu Kadu : अंबानीला एवढाच वन्यप्राण्यांचा शौक असेल तर तिकडे डुकरं पाठवतो !

If Ambani is so fond of wildlife, he would send pigs there : धनंजय मुंडेंवर कारवाई नाही, मात्र शेतकऱ्यांचे खाते गोठवले जाते !

Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे आणि सध्यातरी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे काही दिसत नाही. तरीही त्यांनी ‘सातपुडा’ हा शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही. त्यासाठी छगन भुजबळ यांचा गृहप्रवेश लांबला आहे. त्यामुळे मुंडेंवर चौफर टिका होत आहे. माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही आता या प्रकारावरून सरकारवर टिका केली आहे.

अमरावतीमध्ये आज (४ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची काही थकबाकी असली तर त्यांचे खाते गोठवले जाते. पण धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद गेल्यानंतरही शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यांच्यावर जवळपास ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. या देशात सामान्य लोकांसाठी काहीच राहिलेलं नाही. जे काही आहे, ते नेते आणि अधिकाऱ्यांसाठी आहे. शेतकरी आत्महत्या करतच आहेत आणि नेते व अधिकारी मजा मारत आहेत, असं विदारक चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.

Farmers movement : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल

 

महायुती सरकार म्हणजे ईव्हीएमने केलेला चमत्कार आहे. आम्ही नदीजोड प्रकल्प करतो आहे, अशी अनेक आश्वासने सत्ताधाऱ्यांनी दिली होती. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. आता काय करणार, हे त्यांनी सांगावे. शेतकऱ्यांना केवळ पाणी देऊन नाही चालणार. इतरही अनेक गोष्टी द्याव्या लागतात. शेतकऱ्यांना सोलर दिले, पण सोलरवर पंप चालतात की नाही, हेसुद्धा सरकारला माहिती नाही. सरकारने दिलेल्या सोलरवर पंप चालत नाही, हे एकदा सत्ताधाऱ्यांनी जाऊन बघावे. नाहीतर मी त्यांना दाखवतो, असे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu : मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?

शेतकऱ्यांसाठी डुकरं आणि अंबानीसाठी हत्तीनी, हा सरकारचा कुठला न्याय आहे, असाही जळजळीत प्रश्न बच्चू कडू यांनी केला. इकडे डुकरं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात, त्यावर सरकारला उपाय करता येत नाही. अन् कोल्हापुरची माधुरी हत्तीनी अंबानीच्या जलतारामध्ये कशी नेऊ दिली. यामुळे त्या गावातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अंबानीला येवढाच वन्यप्राण्यांचा शौक असेल तर आम्ही हजार – दोन हजार डुकरं पाठवून देतो तिकडे, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकार आणि अंबानी दोघांवरही ताशेरे ओढले.