Breaking

Devendra Fadanvis : सायबर फसवणूक झाली, काळजी करू नका; १०५ वर कॉल करा !

Money from cybercrimes can be recovered if a complaint is filed on time : वेळेवर तक्रार दिली तर आपण सर्वकाही शोधून काढू शकतो

Nagpur : सायबर गुन्हेगारांचे जाळे आज मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आपल्यालाच सतर्क राहावे लागेल. आज सोशल मिडिया अभिव्यक्तीचे साधन बनले आहे. त्याच पद्धतीने द्वेष पसरवणे, गुन्हेगारी पसरवणे, अंमली पदार्थांचे मार्केटींग होताना दिसते. सायबर फसवणूक झाली तर काळजी करू नका. १०५ या क्रमांकावर कॉल करा. तक्रार वेळेवर दिली तर आपले पैसे परत मिळू शकतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पोलिसांनी गरूड अॅप तयार केले आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल (१० ऑगस्ट) माध्यमांना दिली. ते म्हणाले. सायबर गुन्हेगारांचे ऑरेशन्स परदेशी आहे. याचा सोशल वापर असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. अनेकदा अफवांमुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली आहे. असा दुरूपयोग होत असेल तर त्याची माहिती शोधून कारवाई करण्यासाठी गरुड अॅपची निर्मीती करण्यात आली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यास मदत होणार आहे. यापुढे गरुड दृष्टी हा टुल पाठवून कारवाई करण्यास मदत होणार आहे.

Janakpurush Aandolan : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन

सायबर गुन्ह्यांमध्ये गेलेली रक्कम परत मिळणार नाही, असा नागरिकांचा समज आहे. मात्र बऱ्याच प्रकरणांमध्ये पोलिसांनी वेळेवर कारवाई करून हे पैसे लोकांना परत मिळवून दिले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सायबर गुन्हेगारांच्या विरोधात मार्ग शोधत आहे. दुसरीकडे ते वेगवेगळ्या क्लुप्या लढवताना दिसतात. काही गोष्टी मोफत देण्याचा लालच दाखवून खात्याची माहिती घेण्याचे प्रकार होतात. पण कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही, यावर आपणच विचार करायला हवा. आपण सावध राहणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Vande Bharat : वंदे भारतसाठी नगर ते पुणे वेगळी लाईन होणार

तुमच्या नंबरवरून कुणालाही फोन केला जाऊ शकतो, हे सांगताना फडणवीसांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, मी भाषण करताना एक व्हिडिओ घेतला गेला आणि एक औषधी किती चांगली आहे, याची माहिती मी देत आहे, असा तो तयार करण्यात आला. आम्ही लगेच तो शोधून काढला आणि काढून टाकला. जगातले सर्व टुल्स सॉफ्टवेअर महाराष्ट्रात सुरू केले आहेत. आता अनेक राज्यांनी अशीच लॅब तयार करून देण्याची विनंती केली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.