Breaking

Chandrashekhar Bawankule : मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या, मग हरल्यावर आरोप करू नका !

Opposition parties should check voter lists now : आगामी निवडणुकीत भाजप ५१ टक्के मते घेऊन विजयी होणार

Nagpur : लोकसभा निवडणुकीत चांगला विजय मिळाला, तेव्हा काही बोलले नाही. पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर खापर फोडले. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या. मग हरल्यावर आरोप करत बसू नका, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांना केले आहे.

काल (१० ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, निवडणुकीत प्रत्येक बुथवर त्या त्या पक्षांचे प्रतिनिधी असतात. पेटी सील करेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने हरकत घेतली नाही आणि हरले तेव्हापासून आतापर्यंत ओरडत बसले आहेत. आताही माझे त्यांना आव्हान आहे की, तीन महिन्यांनी पुन्हा निवडणूक आहे. मतदार याद्या लागणार आहेत. त्या याद्या तपासून घ्याव्या. मग हरल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार याद्यांमध्ये घोळ झाला. कारण या निवडणुकांमध्येही भाजप ५१ टक्के मते घेऊन विजयी होणार आहे.

Janakpurush Aandolan : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन

जातिनिहाय जनगणनेबद्दल विचारले असता, काँग्रेस त्यांच्या राज्यात कधीच जनगणना करू शकली नाही. ती मागणी नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले. आता निवडणुका तोंडावर असल्याने त्यांना पुन्हा पुळका आला आहे. शरद पवारांनी ना ओबीसींचं भलं केलं ना मराठा समाजाचं. मराठ्यांनाही आपसात भांडवत ठेवलं. निवडणूक आल्यावर यांची फडफड सुरू होते. मग मात्र घरी बसतात. तसेही ही निवडणूक झाल्यावर त्यांना घरीच बसायचे आहे, असा टोला बावनकुळे यांनी हाणला.