Uday Samant : महायुतीचे सरकार येण्याचे श्रेय एकनाथ शिंदेंना

Credit for the formation of Mahayuti government goes to Eknath Shinde : सकारात्मक वातावरण तयार झाल्यामुळेच सत्ता मिळाली, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

Amravati महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राबवलेल्या विविध योजनांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली, असे ते म्हणाले.

सामंत बुधवारी अमरावती दौऱ्यावर होते. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले, “शिंदे साहेबांनी राज्यात अनेक योजना आणल्या. त्यामुळेच पुन्हा महायुतीची सत्ता आली. यात भाजपला डिवचण्याचा हेतू नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये.”

Zilla Parishad School : शिक्षण सुविधांसाठी आदिवासी पालकांचे ‘झेडपी’त ठिय्या आंदोलन

सामंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचा उल्लेख करत टोला लगावला. “आमचे नेते दिल्लीला जातात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीजवळ बसतात. पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या बैठकीत मागच्या रांगेत ठेवले. यावरून त्यांची किंमत काय ते दिसते,” असे ते म्हणाले.

राज्यात मनसे आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले,‌ “राज ठाकरे राहुल गांधींसोबत जातील का? ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याशी युती करणे योग्य ठरेल का? अशी चर्चा सुरू आहे.”

Uday Samant : कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते

सामंत यांनी पुढे स्पष्ट केले की, येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. “कितीही आघाड्या झाल्या तरी फरक पडणार नाही. मत चोरले हे काँग्रेस आणि उद्धव सेनेला उशिरा आठवले आहे. लोकसभेनंतर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांचा टांगा पलटी झाला. आता ते ईव्हीएमवरून गदारोळ करत आहेत,” असा चिमटा त्यांनी काढला.