Wife demands CID probe into death case : पत्नी सुनिता देशमुख यांची मागणी, कुटुंबासह आमरण उपोषणावर
Buldhana जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी अद्यापही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. स्थानिक जिजामाता प्रेक्षागृह परिसरात त्या आपल्या कुटुंबासह उपोषणावर बसल्या आहेत.
पंकज देशमुख यांच्या मृत्यूला १०० दिवस उलटल्यानंतरही तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप सुनिता देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक वेळा निवेदनं देण्यात आली. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनीही विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
Makrand Patil : औद्योगिक विकासात बुलढाणा आघाडीवर; मुख्यमंत्री रोजगार योजनेत राज्यात चौथा
सुनिता देशमुख यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्याचा माझा हक्क आहे. मात्र, ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री जळगाव जामोद दौऱ्यावर आले असता, निवेदन देण्याऐवजी मला पोलीसांनी बँकेतून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत बसवले. हा प्रकार कायद्याच्या विरोधात आहे, तरी संबंधित पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नाही.”
Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या गटांचा अंतिम आराखडा पाच दिवसांत?
त्यांनी पुढे इशारा दिला की, “पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी मान्य होईपर्यंत आमचे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील.” दरम्यान, मागील दीड महिन्यात अनेक मंत्री, आमदार, खासदार जळगाव जामोदला भेट देऊन गेले, मात्र या प्रकरणात कोणाच्याही लक्षात आले नाही, असा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे. पंकज देशमुख हे गेल्या २२ वर्षांपासून भाजपात कार्यरत होते, हे विशेष.








