Vote theft : मतचोरीविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा, नेते एकवटले

Congress alleges that BJP is attacking democratic principles : भाजपकडून लोकशाही तत्त्वांवर आघात होत असल्याचा आरोप

Chikhli मतदार याद्यांमधील मोठ्या घोटाळ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपकडून मतचोरी करून सत्तेवर येण्यात आल्याचा आरोप करत गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. जयस्तंभ चौकातून सायंकाळी निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने फुले-आंबेडकर वाटिका ओलांडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी हाती मेणबत्त्या आणि निषेध फलक घेत प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, डॉ. मोहंमद इसरार, दीपक देशमाने, प्राचार्य नीलेश गांवडे, प्रा. राजू गवई, अशोक पडघान, जय बोंद्रे, युवक काँग्रेसचे रिक्की काकडे, किसान सेलचे समाधान आकाळ, पर्यावरण सेलचे विजय शेजोळ, तसेच विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Sunil Deodhar : ‘दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल’ यापेक्षा मोठा धोका नाही

अलीकडील निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये फेरफार करून हजारो मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि फसवणूक करून चुकीच्या मार्गाने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न झाला, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी हल्लाबोल करताना सांगितले.

Makrand Patil : औद्योगिक विकासात बुलढाणा आघाडीवर; मुख्यमंत्री रोजगार योजनेत राज्यात चौथा

“हा प्रकार केवळ राजकीय नसून लोकशाहीच्या तत्त्वांवर आणि संविधानावर थेट आघात करणारा आहे. मतचोरी म्हणजे मतदारांचा अपमान आहे. आता देशभरात याविरोधात संघर्ष उभारला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.