Demand for 100 percent compensation for damage caused by heavy rains : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची १०० टक्के भरपाई देण्याची मागणी
Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने शासनाच्या दुटप्पी धोरणांचा बळी ठरत असून, पिक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रश्नावर आता संतापाचा सूर चढू लागला आहे. “पिक विमा व नुकसान भरपाई आम्हाला मेल्यावर देता का?” असा संतप्त सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना केला.
तुपकर म्हणाले की, “बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मधील तब्बल २ लाख ४४ हजार २६२ शेतकरी आजही पिक विम्यापासून वंचित आहेत. हुमणी अळीमुळे झालेले नुकसान, तसेच मेहकर आणि लोणार तालुक्यातील ढगफुटीमुळे झालेले प्रचंड नुकसान भरपाईशिवाय राहिले आहे. मिळाली तरी ती तोकडी रक्कम शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे.”
Seperate Vidarbha State : विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान, विदर्भवाद्यांचा निर्धार
तुपकरांनी बुलढाणा जिल्ह्यातील ६६०७ शेतकऱ्यांना वितरित झालेल्या १४ कोटींच्या पिकविम्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पैसे मिळाले तरी अत्यल्प रक्कम देऊन सरकार व विमा कंपन्या जनतेची दिशाभूल करत आहेत. एकाच गट क्रमांकात समान नुकसान होऊनही एकाच शेतकऱ्याला विमा मिळतो, तर शेजारील शेतकऱ्याचा दावा फेटाळला जातो. हा विमा कंपन्यांचा दुटप्पीपणा आहे, आणि कृषी विभागही या कारभारात सामील आहे.” असे तुपकरांनी स्पष्ट केले.
Maharashtra politics : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू
सन २०१४ ते २०२४ या कालावधीत विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट करण्यात यावे, बुलढाण्यातील पिक विम्यापासून वंचित २.५ लाख शेतकऱ्यांना दुजाभाव न करता १००% विमा भरपाई मिळावी, हुमणी व शेंडा अळीमुळे झालेल्या नुकसानीस वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील शेती, घर व पायाभूत सुविधांच्या नुकसानीस १००% भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी तुपकर यांनी केली.
तसेच तुपकरांनी शासनाकडे “पोटखराब जमिनीची मदत मिळवताना होणारी प्रशासकीय किचकट प्रक्रिया सुलभ करावी; कारण त्यामुळे शेतकरी पुढील काळात पीकपेरा, बँकेचे कर्ज या सगळ्या गोष्टींना मुकतो.” अशी मागणीही केली.तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला.








