Mahajan Vs Raut : ठाकरे बंधू एकत्र आले तर रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल !

Girish Mahajan is not Maharshi Vyas, says Sanjay Raut : गिरीश महाजन महर्षी व्यास नाहीत संजय राऊतांचा टोला

Nashik : नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांना चांगलाच खरपूस समाचार घेतला. नुकतेच महाजन यांनी “ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुंबई, पुणे, नाशिक सारख्या ठिकाणी निवडून दाखवावं” असे आव्हान दिले होते. त्यावर पलटवार करत राऊत म्हणाले की, गिरीश महाजन हे महर्षी व्यास नाहीत की काहीही बोलावं आणि काहीही करावं. स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्यांनी पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल, त्या दिवशी त्यांची अवस्था काय असेल याचा विचार त्यांनी करावा. ठाकरे बंधू एकत्र आले तर या लोकांना रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. फडणवीसांच्या भोवती फिरणारे चोर, लफंगे, दरोडेखोर रस्त्यावर दिसणार नाहीत, असा त्यांनी हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले की, मिस्टर महाजन, आज तुमची मस्ती ही लुटलेल्या पैशांची आणि सत्तेची आहे. तुम्ही प्रमोद महाजन नाही, तर जामनेरचे गिरीश महाजन आहात. आत्मचिंतन करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, हे पाहा. मग तुम्ही ठाकरे कुटुंबावर बोला. आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात, असा टोला त्यांनी लगावला.

Maharashtra politics : घोडामैदान जवळच, वल्गना करण्याचा उपयोग नाही

दरम्यान, भाजप आमदार गणेश नाईक यांनी “एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आहे, पण कमावलेलं टिकवावं लागतं” असा टोला लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, गणेश नाईक हे संयमी राजकारणी आहेत. त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही. त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या मनात मटका होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा मटका लागलेला आहे तो संभाळून ठेवावा लागेल. पण मटक्याचे आकडे चंचल असतात. शिंदेंचा मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो आणि त्यांना तो संभाळता येत नाही, असा थेट हल्ला राऊतांनी शिंदेंवर चढवला.

_____