Cementing of asphalt roads : रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा
Wardha शहरातून यवतमाळकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर सध्या सिमेंटीकरणाचा घाट घातल्या जात असल्याचे चित्र आहे. महामार्ग प्रशासनाकडून हा अजब प्रकार सुरू असल्याने नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहे. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा आता नागरिकांत सुरू आहे.
यशोदा नदीचा बोगदा ते देवळीच्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर प्लास्टिक पन्नी टाकून त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास नेले जात आहे. याबाबत कंत्राटदाराच्यावतीने कार्यरत असलेले अभियंता कुबडे यांना विचारणा केली. त्यांनी ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या बरोबर असल्याचे सांगितले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाईंडिंग करण्यासोबतच आधीचा डांबरी रस्ता न तोडता त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत असल्याचे कुबडे यांनी सांगितले.
Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल
विशेष म्हणजे बुटीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण होत असताना या मार्गावरील जुना डांबरी रस्ता तोडून नव्याने सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले होते. त्यामुळे देवळीतून जाणारा महामार्गाचा रस्ता सुद्धा याच पद्धतीने असण्याची अपेक्षा होती. मात्र, याठिकाणी वेगळाच फॉर्म्युला वापरून रस्त्याचे बांधकाम केले जात असल्याचे दिसून येत आहे. आधीच्या डांबरी रस्त्यावर चक्क सिमेंट रस्ता चढवून कामाला गती दिली जात आहे.
बांधकामाच्या नवीन पद्धती बद्दल विचारणा केली असता, सदर बांधकाम टेक्निकली बरोबर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रस्ता बांधकामाचा हा प्रकार येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.
CM Devendra Fadnavis : मेयो-मेडिकलमधील कामांच्या देखरेखीसाठी वॉर रूम !
मातीमिश्रित मुरुमाचा वापर
नव्याने सुरू असलेल्या रस्ता बांधकामात अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या साइड पट्ट्यामध्ये मातीमिश्रित मुरुमाचा वापर करण्यात येत आहे. शिवाय या कामात वापरण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रीटची गुणवत्ता, महामार्गाच्या इस्टिमेटला साजेशी नसल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ संबंधित कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी रस्त्याचे बांधकाम ओढले जात असल्याची टीका होत आहे.








