‘Emergency’ is not a matter of entertainment : नितीन गडकरी यांनी केले कंगना रनौतच्या चित्रपटाचे कौतुक
Nagpur ‘इमर्जन्सी’मध्ये अनेकांनी संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. या संघर्षात सर्वसामान्य लोकही होते. या विषयावर चित्रपट आल्याने आणीबाणीचा इतिहास लोकांना कळेल. नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आणीबाणीविरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी कंगना रनौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे कौतुक केले.
खासदार कंगना रानौत अभिनित व दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे प्रीमियर आज नागपुरात आयोजित करण्यात आले. नितीन गडकरी, अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेते पद्मश्री अनुपम खेर यांची यावेळी उपस्थिती होती. मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात या प्रेमियरचे आयोजन करण्यात आले. यावेळी आणीबाणीचा काळ अनुभवणारे, त्या काळात तुरुंगवास सोसणारे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
Plastic kites Nylon Manja : ३० हजार प्लास्टिकच्या पतंग जप्त !
नितीन गडकरी यांनी आयोजित केलेल्या या प्रिमियरला आणीबाणीचा काळ अनुभवणारे लोक उपस्थित होते. तसेच शहरातील उद्योजक, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आदींची उपस्थिती होती. कंगना रनौत, अनुपम खेर यांनी या मंडळींशी संवाद साधला. यामध्ये विशेषत्वाने ज्येष्ठ संपादक लक्ष्मणराव जोशी, एस.एन. विनोद यांची उपस्थिती होती.
कंगना रनौत यांचा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी नागपुरात त्याचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला. त्याबद्दल कंगना रनौत आणि अनुपम खेर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा चित्रपट सर्वांत पहिले नागपूरकर बघत असल्याचा आनंद असल्याचे कंगना म्हणाल्या.
नागपूरकर ठरतील चित्रपटाचे ‘प्रचारक’
अनुपम खेर म्हणाले, ‘नितीन गडकरी यांना भेटून मला कायम आनंद होतो. आज दिवसभर कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभत आहे. त्यांनी इमर्जन्सी चित्रपटाचे प्रीमियर घडवून आणला, याचा विशेष आनंद आहे. नागपुरातील प्रेक्षक खूप चांगला आहे. त्यामुळे इथून चित्रपटाची चर्चा देशात जाईल. नागपूरकर खऱ्या अर्थाने चित्रपटाचे प्रचारक ठरतील.’