Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा! मुंबईच्या व्यापाऱ्याचे ४.६० कोटींचे सोने लुटले

Robbery on Samruddhi Highway, Gold worth 4.60 crores looted : एका आरोपीला अटक, दोन कार जप्त; मिरचीपूड टाकून व्यापाऱ्याला जखमी केले

Buldhana समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मोठी लूटमारी झाली आहे. मुंबईतील सराफा व्यापाऱ्याचे तब्बल ४ कोटी ६० लाखांचे पावणे पाच किलो सोने दरोडेखोरांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, महामार्गावरील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सराफा व्यापारी अनिल शेशमलजी चौधरी हे एमएच-४३-बीयू-९५५७ या क्रमांकाच्या गाडीतून मुंबईकडे निघाले होते. फरदापूर टोलनाका पार झाल्यानंतर चालकाने पोटदुखीचे कारण सांगून गाडी बाजूला उभी करण्यास सांगितले. व्यापारी गाडी चालवत असतानाच मागून आलेल्या इनोव्हा गाडीतून चार-पाच दरोडेखोर उतरले आणि व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला करून डोळ्यांत मिरचीपूड फेकली.या गोंधळात व्यापाऱ्याचाच चालक सोन्याने भरलेली बॅग घेऊन दरोडेखोरांच्या गाडीत बसला. घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gambling house : नितेश राणे यांची कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड !

दरोडेखोरांनी मालेगाव टोलनाका ओलांडताना पोलिस अडथळा तोडून पळ काढला. मात्र, पातूरच्या जंगल परिसरात पोलिस नाकाबंदीच्या भीतीने त्यांनी इनोव्हा गाडी सोडली आणि अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मेहकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Mumbai police : 364 पोलिसांच्या पदोन्नतीचा आदेश 24 तासांत रद्द

या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा दावा होत असतानाच, अशा लूटमारींनी प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यंत्रणांनी तातडीने अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू आहे.