Nana Patole : नाना पटोलेंनी सुचवला मराठा आरक्षणावरील उपाय !

Congress Proposes Solution on Maratha Reservation : गेल्या अनेक वर्षांपासून हा देश भाजपचा खोटारडेपणा पाहात आहे

Nagpur : देशाचा पंतप्रधान ओबीसी असुनसुद्धा ओबीसींना न्याय दिला जात नाही. कोणालाही आरक्षण दुसऱ्यांच्या हिश्श्यातून द्यायची गरज नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जात निहाय जनगणना झाली पाहिजे. आम्ही सत्तेतून बाहेर गेलो म्हणून हे बोलत नाही आहोत, तर आधीपासून आमची हीच भूमिका आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा देश भाजपचा खोटारडेपणा पाहात आहे. मराठा, ओबीसी सर्वांना या सरकारने फसवले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धग थांबवायची असेल तर गणेशोत्सवात सकारात्मक विचार सरकारने स्वीकारले पाहिजे. आरक्षणासंदर्भात काँग्रेसने वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. जात निहाय जनगणना केल्यास आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटू शकतील. आमच्या मागणीनंतर मोदी सरकारने जात निहाय जनगणनेची घोषणा केली. पण प्रक्रिया मात्र अद्यापही सुरू केलेली नाही, असे पटोले यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली !

मनोज जरांगे यांनीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. सरकारनेही दोन पावले पुढे जात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांवर अमलबजावणी का झाली नाही, याचे उत्तर मिळाले पाहिजे. नाहीतर या सरकारवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. शेतकरी आत्महत्या करताना सरकारचे नाव घेतात. त्यांच्या नावाने चिठ्ठ्या ठेवतात. या सरकारवर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

Centers firm stance : राष्ट्रपती – राज्यपालांच्या निर्णयांविरोधात याचिकेचा अधिकार नाही !

सरकारने पुढे होऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करावी. त्यांना मुंबईत कशाला येऊ द्यावे, असा प्रश्न पटोले यांनी केला. ऐन गणोशोत्सवात आंदोलन होते आहे. हा महाराष्ट्राचा सण आहे. या आंदोलनाची झळ लोकांना बसणार नाही, याचीही काळजी सरकारने घ्यावी, असे नाना पटोले म्हणाले.