Amit Shah censured for statement against the Prime Minister : पंतप्रधानां विरोधातील वक्तव्यावर अमित शाह यांनी सुनावले
Guwahati : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसच्या सभेत आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या पारभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने केलेल्या शिवीगाळीमुळे मोदींचा अपमान होत नाही, उलट त्याचा फायदा भाजपाला होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. “काँग्रेस जितक्या शिव्या देईल, तितक कमळ अधिक फुलेल,” असे शाह म्हणाले.
गुवाहाटीतील सभेत बोलताना शाह म्हणाले की, “आज जगातील २७ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान बहाल केला आहे. संपूर्ण जग ज्यांचा आदर करतं, अशा पंतप्रधानांविषयी भारतातच काँग्रेसचे नेते अपशब्द वापरतात, ही लाजिरवाणी बाब आहे.”
Tiger in BJP – Congress : पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द !
काँग्रेसवर निशाणा साधताना शाह म्हणाले, “राहुल गांधींनी ज्या प्रकारे नकारात्मक राजकारणाची सुरुवात केली आहे, ते आपल्या सार्वजनिक जीवनाला गर्तेत नेणार आहे. मोदी जी मुख्यमंत्री झाल्यापासूनच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. आता त्यांच्या आईविषयी अपमानास्पद शब्द वापरणे ही राजकारणातील नीचतम पातळी आहे. मी या भाषेचा तीव्र निषेध करतो.”
Maratha movement : प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, त्यांचं निवेदन आल्यावर चर्चा करू !
शाह यांनी पुढे काँग्रेसच्या “घुसपैठिया बचाओ यात्रा” वरूनही टीका केली. “राहुल गांधींच्या स्वागत मंचावरून नरेंद्र मोदींना व त्यांच्या मातोश्रींना अपशब्द बोलले गेले. ही राजकारणातील सर्वात घृणास्पद कृती आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी शाह यांनी स्पष्ट संदेश दिला – “काँग्रेस जितक्या गाल्या देईल, तितका भाजपाचा कमळ अधिक फुलेल. मोदींविरोधातील अपशब्द भाजपासाठी जनसमर्थनात रूपांतरित होतील.”काँग्रेसकडून अद्याप या वक्तव्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेसवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
____








