A Devoted Fan Honors Sudhir Mungantiwar with a Unique Present : मुनगंटीवारांच्या विकासकार्यावर प्रभावित
Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच लंडनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या सन्मानाने लोकमत समुहातर्फे गौरवण्यात आले. त्यानंतर आज (२९ ऑगस्ट) त्यांचे बल्लारपूर येथे प्रथम आगमन झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी शहराध्यक्ष काशीनाथ सिंह यांनी आपल्या रक्ताने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ लिहीलेली फोटो फ्रेम आमदार मुनगंटीवार यांना भेट दिली.
काशीनाथ सिंह यांचे प्रेम बघून आमदार मुनगंटीवार भारावून गेले. येवढे जिवापाड प्रेम व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. लंडनवरून पुरस्कार घेऊन बल्लारपूरमध्ये आमदार मुनगंटीवार यांच्या प्रथम आगमनाची तयारी काशीनाथ सिंह यांनी आधीपासूनच करून ठेवली होती. आपल्या रक्ताने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ लिहून त्यांनी आमदार मुनगंटीवार यांना अविस्मरणीय भेट दिली.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या रस्ते अन् उड्डाणपूलांसाठी मुनगंटीवारांची आग्रही मागणी
सुधीर मुनगंटीवार आमच्यासाठी फक्त नेते नाहीत, तर प्रेरणा आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामांची महती शब्दांत मांडता येणे अवघड आहे. भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले काशिनाथ सिंह यांनी यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या हातावर मुनगंटीवार यांचा टॅटू काढलेला आहे. काशीनाथ सिंह हे अनोखे समर्पण आणि निस्वार्थ कार्यामुळे ते आमदार मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते म्हणून चागलेच लोकप्रिय आहेत. आमदार मुनगंटीवार यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेमुळेच आपण समाजोपयोगी कार्य करू शकत आहो, असे सिंह यांनी सांगितले.
___








