Breaking

Nagpur Crime : कंत्राटदाराने दिले बोगस नियुक्तीपत्र !

 

ACB arrested a contractor while taking bribe of 35 thousand : ३५ हजाराची लाच घेण्याचा प्रयत्न; एसीबीने केली अटक

Nagpur औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्तीपत्र देतो, असे सांगितले. आणि ३५ हजार रुपयांची लाच घेण्याचा प्रयत्न केला. शासकीय कंत्राटदाराचा हा प्रकार उघडकीस आला. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.

कंत्राटदाराविरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंदकिशोर पंजाबराव गवारकर असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नंदकिशोर गवारकर हा अभिजीत इंटेलिजन्स सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर कंपनीचा संचालक आहे.

Indranil Naik : पुसद एमआयडीसीत समस्या उरणार नाहीत

 

त्याच्या कंपनीकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कंत्राटी पध्दतीने प्रशिक्षक, कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट आहे. तक्रारदार हा उच्चशिक्षित तरुण असून त्याची निवड नागभीड येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेश पदावर झाली. मात्र, त्याला अद्यापर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. तसेच त्यांची सहकारी महिला हिलासुद्धा कंत्राटी सफाई कर्मचारी पदाचे नियुक्तीपत्र मिळाले नाही.

त्यामुळे त्याने नंदकिशोर गवारकर यांची भेट घेतली. तक्रारदाराला २५ हजार तर त्याच्या सहकारी महिलेला १० हजार रुपये अशी एकूण ३५ हजार रुपयांची लाच गवारकर याने मागितली. त्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली. एसीबीने शनिवारी बजाजनगरातील गवारकरच्या कार्यालयात सापळा रचला.

Akola Municipal Corporation : कर वसुलीसाठी प्रशासन आग्रही

 

तक्रारदार शिक्षकाने लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शविली. कार्यालयातच लाच घेताना गवारकर याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करून बजाजनगर पोलीस ठाण्यात डांबण्यात आले.

वाहनचोरांना अटक
आठवडी बाजारांमधून दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चौकशीत त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून 20 वाहन चोरी केल्याची कबुली दिली. नवीन देविदास रासा (37) रा. महाकाली कॉलनी, चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नवीन दीड वर्षापूर्वी रोजगाराच्या शोधात नागपुरात आला होता. लोकमान्यनगरात भाड्याने खोली घेऊन एमआयडीसीच्या एका कंपनीत काम करीत होता.