Raut provoked Bhujbal by asking direct questions : थेट सवाल करत राऊतांनी भुजबळांना डिवचलं
Mumbai : मराठा आरक्षणाच्या जीआरवरून नाराजी व्यक्त केलेल्या मंत्री छगन भुजबळांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “तेव्हा तुम्ही मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना सोडली होती, आता मंत्रिमंडळ सोडणार का?” असा थेट सवाल करत राऊतांनी भुजबळांना डिवचलं.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. त्यांनी सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार टाकला. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि तेही मोदींच्या सांगण्यावरून. ओबीसी असल्याने त्यांना मंत्रिपद मिळालं. ही मोदींची कृपा आहे. मग आता तुम्ही समाजावर अन्याय झाल्याचं सांगत असाल, तर मंत्रिमंडळ सोडणार का? राजीनामा देऊन दाखवणार का?” असा थेट सवाल राऊतांनी केला.
ते पुढे म्हणाले, “मंडल आयोगाच्या मुद्यावरून तुम्ही शिवसेना सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की शिवसेना जातीपातीचं राजकारण करणार नाही. पण तुम्ही तेव्हा सोडलंत. मग आता या मुद्यावर मंत्रिमंडळ सोडणार का?”
GST Reforms : काँग्रेस तंबाखू, गुटख्यावर 5 टक्के कराची मागणी करत आहे का?
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ येथे भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर राऊत म्हणाले, “वर्षावरचा गणपती हा मुख्यमंत्री निवासस्थानी असलेला परंपरागत गणपती आहे. राज ठाकरे हे गणेशभक्त आहेत. मुख्यमंत्री आमंत्रण देतील तर जाण्यात काही गैर नाही.”
____








