Maratha Reservation : लोणारमध्ये ओबीसी समाजाकडून जीआरची होळी!

Intense anger among OBCs against Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात तीव्र संताप, अन्याय होत असल्याची भावना

Lonar मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरविरोधात लोणार शहरात सकल ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन छेडले. तहसील कार्यालयासमोर जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी माळी, कोळी, वाणी, वंजारी, कुरेशी यांसह इतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासंदर्भात तहसीलदार मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आधीच ओबीसीमध्ये साडेतीनशे जातींचा समावेश आहे आणि त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. अशा परिस्थितीत आणखी एक मोठा समाज ओबीसीमध्ये आणणे हा मुळ ओबीसी समाजावर अन्याय आहे.

Government Contractors’ Bills : शासकीय कंत्राटदारांची बिले लवकरच मिळणार !

ओबीसी बांधवांनी स्पष्ट केले की, जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आला तर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा, संसद पर्यंतचे राजकीय प्रतिनिधित्व मर्यादित ओबीसींना मिळणार नाही. “ओबीसी फक्त मतदार म्हणून शिल्लक राहतील, प्रतिनिधित्व मराठ्यांकडे जाईल,” अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

सगे-सोयरे किंवा सरसकट समाजाच्या संख्येचा आधार हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा हाच घटनात्मक निकष आहे. त्या निकषानुसार मराठा समाज पात्र ठरत नाही, तरीही शासनाने जीआर काढला, हे मुळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

Sudhir Mingantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात महामंत्री व आघाडी अध्यक्ष घोषीत !

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, ओबीसी समाज उग्र भूमिका घेत आहे. सरकारच्या निर्णयामुळे सामाजिक तणाव वाढू नये, यासाठी प्रशासनाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद राजकीयदृष्ट्या अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.