Ramdas Athavle : अपयश आल्यामुळे काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप

Union ministers criticize Congress over vote theft allegations : इंडिया आघाडीचे राजकारण दुटप्पी, रामदास आठवलेंची टीका

Shegao महायुतीवर काँग्रेस वारंवार मतचोरीचे आरोप करत आहे. मात्र राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिक खासदार निवडून आले तेव्हा ते निवडणूक आयोगावर बोलले नाहीत. अपयश आल्यामुळे मतचोरीचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. हे दुटप्पी राजकारण आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

शेगाव येथील स्व. केशरबाई देशमुख मंगल कार्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त समारोपीय मेळाव्यात बोलत होते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सचिन देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Ramdas Athavle : मराठा आरक्षणावर आठवलेंचे महत्त्वाचे विधान!

‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे आणि ती मान्य होईल,’ असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने दलित, आदिवासी, ओबीसी व सर्व घटकांच्या विकासासाठी कार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील इंदू मिलची जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंच पुतळ्यासाठी दिली असून, त्याचे काम वेगाने सुरु आहे. हे महायुती सरकारच्या बांधिलकीचे उदाहरण आहे.”

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन

मातंग समाज आजही उपेक्षित आहे. या समाजातील युवक-युवतींनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. घरातील प्रत्येक युवक-युवती सुशिक्षित झाली, तरच मातंग समाजाला पुढे नेता येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी केले.