Chandrashekhar Bawankule : ..तर रोहित पवारांनी राजकीय सन्यास घ्यावा !

NCP Sharad Pawar party’s MLA Rohit Pawar Should Quit Politics : ‘त्या’ प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती, दंड माफ केलेला नाही

Nagpur : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाल्याचे नंतर त्यांनी म्हटले. पण कुठलाही अभ्यास नसताना त्यांनी असे उठसूठ आरोप करू नये. खरं तर रोहित पवार जे म्हणत आहेत, त्यात तत्कालिन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगिती दिली होती. तेव्हाही दंड माफ करण्यात आला नव्हता. रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा, असे म्हणत बावनकुळे यांनी पवारांना आव्हान दिले आहे.

प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरिता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप करू नये. यातून ते केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळत नाही. राजकीय आरोप करून असलेली राजकीय उंची कमी करू नये. पवारांचा हा प्रयत्न म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. राजकारणात ते नवीन आहेत. त्यांनी आधी अभ्यास करावा त्यानंतरच कुठलेही आरोप करावे, असे बावनकुळे म्हणाले.

Cabinet meeting : शेतकऱ्यांना दिलासा, शहरांसाठी विकास प्रकल्प

११ जुलैला विधिमंडळात जो प्रश्न आला होता, तो मागच्या काळात झालेल्या प्रकरणाबाबत होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. एका उत्खणनाच्या प्रकरणात कुठलाच दंड तेव्हा माफ केलेला नव्हता अन् आताही केलेला नाही. रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे. विरोधी पक्षात मी एकटाच लढवय्या आहे, असे त्यांना दाखवायचे आहे. ते म्हणत असलेल्या प्रकरणात तत्कालिन महसूल मंत्र्यांनी केवळ स्थगिती दिली होती. माझ्या कार्यकाळातही दंड माफ केलेला नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.