Shocking statistics revealed from MPSC results : एमपीएससी निकालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी
Mumbai : राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला झुगारून आंदोलन पेटवलं. सरकारवर दबाव वाढल्यानंतर हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढण्यात आला. त्यामुळे, कुणबी पुरावा सादर करणाऱ्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठा बदल झाला आहे. मराठा समाजाला मिळणारे आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस आरक्षण आता रद्द झाले आहे.
पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण लागू केले होते. त्यामुळे मराठा समाजासमोर आता फक्त दोनच पर्याय खुले आहेत, ओबीसी जर कुणबी पुरावा मिळाला तर किंवा एसइबीसी. परिणामी, ईडब्ल्यूएस कोट्यातून मराठा समाज पूर्णपणे बाहेर पडला आहे.
Caveat filed : हैदराबाद गॅझेटियर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल !
नुकताच जाहीर झालेल्या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालातून ही स्थिती अधिक स्पष्ट झाली. ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गाचा कट-ऑफ : 507 गुण एसईबीसी मराठा प्रवर्गाचा कट-ऑफ : 490.75 गुणयावरून स्पष्ट होतं की एसईबीसी मध्ये संधी असली तरी स्पर्धा प्रचंड आहे. उलट ईडब्ल्यूएस संधी गमावल्यामुळे मराठा उमेदवारांना नोकरी मिळवणं अधिक अवघड होणार आहे.
मराठा समाज बाहेर गेल्यामुळे ईडब्ल्यूएस कोट्यातील लोकसंख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रवर्गातील कट-ऑफ कमी राहण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फायदा ईडब्ल्यूएस मधील इतर उमेदवारांना मिळू शकतो. कमी गुणांवरही त्यांची निवड होण्याची शक्यता असल्याने ईडब्ल्यूएस मधील तरुणांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
Raj Uddhav meeting : राज-उद्धव सविस्तर भेटीने रंगल्या राजकीय चर्चा !
मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवून बहुसंख्य मराठा उमेदवार ओबीसी मध्ये जाणार असल्यामुळे या प्रवर्गात प्रचंड स्पर्धा निर्माण होईल. काही तज्ज्ञांच्या मते, भविष्यात ओबीसी प्रवर्गातील कट-ऑफ ओपनपेक्षाही जास्त लागण्याची शक्यता आहे. जशी स्थिती SC, ST, VJ, NT प्रवर्गात दिसते, तसाच दाब आता ओबीसीवर येणार आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, आरक्षणातील या फेरबदलाचा सरळ परिणाम MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या निकालावर होईल. “EWS मध्ये स्पर्धा कमी, पण OBC मध्ये मोठा स्फोट,” असं या समितीने स्पष्ट केलं आहे.
_____








