Citizens’ Protest Against Coal Mines : अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वलनी- दहेगाव-गोवारी भूमिगत कोळसा खाणीच्या विरोधात असंतोष
Nagpur प्रसिद्ध उद्योगपती अदानी उद्योग समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वलनी- दहेगाव-गोवारी भूमिगत कोळसा खाणीच्या विरोधात नागपूर जिल्ह्यात मोठा असंतोष उफाळून आला आहे. या विरोधात बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावीतने आयोजित केलेल्या सुनावणीत प्रकल्पग्रस्त सुमारे १० गावांच्या नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवला. यावेळी नही चलेगी…नही चलेगी…अदानी तेरी तानाशाही अशा घोषणा देण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदारांच्या sunil kedar मतदारसंघात हा खाणपट्टा असल्याने यावरून राजकीय वातावरणसुद्धा तापणार असल्याचे दिसून येते.
नागपूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटवर अंतरावर असलेल्या दहेगाव येथे अदानी समूहाला भूमिगत खाण पट्टा वाटप करण्यात आला आहे. या खाणीच्या विरोधात अनेक दिवसांपासून गावकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत होता.
आपल्या शेत जमीन जातील, जलस्रोत खराब होतील, पशुधनाचे नुकसान होईल तसेच खाणीच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
EWS reservation ends : मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण संपुष्टात !
दुसरीकडे कोळसा खाण भूमिगत असल्याने कुणाच्याही जमिनी अधिग्रहित केल्या जाणार नाही, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, पाण्याचे स्रोत खराब होणार नाही असा दावा अदानी समूहाच्यावतीने केला जात आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर खाणीबाबत सकारात्मक संदेश फिरवून जनमानसातून विरोध होणार यासाठी प्रयत्न केले जात होते. याशिवाय मागील दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट कंपनीच्यावतीने आसपासच्या गावांमधील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरावर वृक्ष उपलब्ध करून दिले जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने या खाणीवर जनसुनावणी आयोजित करण्यात आली असल्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे आधीच वातावरण तापले होते.
Caveat filed : हैदराबाद गॅझेटियर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल !
आज १० गावांमधील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली आणि जोरदार घोषणाबाजी करून या खाणीला तीव्र विरोध केला. धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचे काय? आमच्या आरोग्याचे काय? शेतीयोग्य जमिनीवर व जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होणारी याची हमी कोण देणार असा सवाल यावेळी खाण प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला. तत्पूर्वी, या खाणीला विरोध दर्शवण्यासाठी वलनी गाम पंचायत सरपंच यांच्यावतीने ७९० लोकांचे आक्षेपांचे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोपवण्यात आले आहे. या खाणीमुळे होणाऱ्या नुकसानीकडे व प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहेत. वलनीच्या सरपंचांनी पाठवलेल्या पत्रात ७९० लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे आक्षेप फक्त एका वलनी या गावातील नागरिकांचे आहेत. आहे. एकूण १० गावे यामुळे प्रकल्पबाधित होणार आहेत. या संपूर्ण परिसरात कापूस, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांची लागवड प्रामुख्याने केली जाते. या खाणीमुळे दहा गावे उध्वस्त होणार आहेत. आमची सुपिक जमीन पडीक होऊन पोट्यापाण्याची सोयही हिरावली जाणार असल्याचा आरोप यावेळी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी केला.
Raj Uddhav meeting : राज-उद्धव सविस्तर भेटीने रंगल्या राजकीय चर्चा !
कागदावर स्वाक्षरी करण्यास प्रकल्पग्रस्तांचा नकार
विशेष म्हणजे सुनावणीला येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एका कागदावर नाव, गाव लिहून स्वाक्षरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्वाक्षऱ्यांच्या कागद रजिस्टरमध्ये ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना शंका आली. प्रकल्पग्रस्तांनी कागदावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला. स्वाक्षऱ्या घेऊन खाणीला गावकऱ्यांचा विरोध नाही हे दाखवण्यासाठी रजिस्टर ऐवजी कागदावर स्वाक्षऱ्या करण्याचे सांगण्यात येत होते असाही आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे.