Reservation controversy : मराठा आरक्षणामुळे ओबीसींना धक्का बसणार नाही’!

Ajit Pawars assurance after the suicide of an OBC youth : ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर अजित पवारांचे आश्वासन

Mumbai : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या हक्कांवर कुठलाही आघात होणार नाही,” असे आश्वासन दिले.

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ३५ वर्षीय भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात येईल या भीतीतून मांजरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. पवार यांनी ट्विटरवरून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “भरत कराड यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे,” असे पवार म्हणाले.

Local Body Elections : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांचा शोध!

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “आपलं सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. या संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, ही विनंती मी सर्वांना करतो.”

Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली

भरत कराड गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या हालचालींमुळे चिंतेत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती त्यांना सतावत होती. आपल्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीतील भविष्यासंदर्भात ते निराश झाले होते. त्यांना पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये, “माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय द्या,” असे आवाहन केलेले आहे. या घटनेमुळे राज्यातील ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली असून, सरकारवर आरक्षणासंबंधी स्पष्ट भूमिका घेण्याचा दबाव वाढत आहे.