व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली

Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली

Reservation for the Zilla Parishad President post announced : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, राजकीय समीकरण बदलणार

Akola सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण जाहीर केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना ग्रामविकास विभागाने राज्य राजपत्रात प्रसिद्ध केली.

या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती, महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्ग यांना प्रमाणानुसार आरक्षण देण्यात आले आहे.

विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करता, अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला), यवतमाळ सर्वसाधारण, नागपूर मागासवर्ग, वर्धा अनुसूचित जाती, भंडारा मागासवर्ग, गोंदिया सर्वसाधारण (महिला), चंद्रपूर अनुसूचित जाती (महिला) तर गडचिरोली सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Local Body Elections : निवडणूक आचारसंहितेची धाकधूक, पालकमंत्र्यांची लगीनघाई!

दरम्यान, पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीदेखील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग व महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यांतील काही पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी विशेष आरक्षण लागू करण्यात आले आहे. कारण या अनुसूचित क्षेत्रांतील लोकसंख्येत अनुसूचित जमातींचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण

या नव्या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार असून स्थानिक पातळीवरील राजकारणाला नवा कलाटणी मिळणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण

1. ठाणे – सर्वसाधारण (महिला)
2. पालघर – अनुसूचित जमाती
3. रायगड – सर्वसाधारण
4. रत्नागिरी – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
6. नाशिक – सर्वसाधारण
7. धुळे – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
8. नंदुरबार – अनुसूचित जमाती
9. जळगाव – सर्वसाधारण
10. अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)
11. पुणे – सर्वसाधारण
12. सातारा – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
13. सांगली – सर्वसाधारण (महिला)
14. सोलापूर – नागरिकांचा मागासवर्ग
15. कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
16. छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
17. जालना – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
18. बीड – अनुसूचित जाती (महिला)
19. परभणी – अनुसूचित जाती
20. हिंगोली – नागरिकांचा मागासवर्ग
21. नांदेड – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
22. धाराशिव – सर्वसाधारण (महिला)
23. लातूर – सर्वसाधारण (महिला)
24. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
25. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
26. वाशीम – अनुसूचित जमाती (महिला)
27. बुलढाणा – सर्वसाधारण
28. यवतमाळ – सर्वसाधारण
29. नागपूर – नागरिकांचा मागासवर्ग
30. वर्धा – अनुसूचित जाती
31. भंडारा – नागरिकांचा मागासवर्ग
32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
34. गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

error: Content is protected !!