Chhagan Bhujbals statement sparks a new controversy in the state : छगन भुजबळांच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड
Mumbai : मनोज जरांगे पाटील यांना जे समर्थन करतात, त्यांच्या जवळ जातात, त्यांना ओबीसींनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे, या विधानामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण पेटले असून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापू लागला आहे.
याबाबत भुजबळांनी सडेतोड उत्तर दिले. “त्याचा काय अर्थ काढायचा ते आमचे लोक, ओबीसीचे कार्यकर्ते योग्य अर्थ काढतील, तुम्ही काळजी करू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या विरोधात भुजबळ सतत आक्रमक भूमिकेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केल्याचे दिसून आले.
Heavy rains hit : अतिवृष्टीत शेतपिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याचे सुरू !
भुजबळांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांवरही निशाणा साधला. “त्यांची आधीही बरीच उपोषणं झाली पण कुणी त्यांच्याकडे बघत नव्हतं. त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, पण कुणीही त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पवार साहेब गेले, मग उद्धव ठाकरे गेले आणि त्यानंतर सगळेच तिकडे जाऊ लागले,” असे भुजबळांनी म्हटले.
दरम्यान, ओबीसी समाज आक्रमक झाला असून मोर्चेबांधणी सुरू आहे. नागपूरमध्ये बैठक पार पडली असून मुंबईत मोर्चाची चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, “मुंबईत येणार, बीडला येणार, दिल्लीतही येणार. आम्ही आमच्या पद्धतीने महात्मा फुले समता परिषदेतर्फे ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅलीज घेणार आहोत. यात आम्ही सुद्धा उतरू.”
ladki bahin Yojana : लाडकी बहीण’ योजने संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
“कारण जर जमावापुढे आणि झालेल्या गर्दीपुढे निर्णयाचा परिणाम होत असेल, तर आम्हालाही दाखवावं लागेल की आम्हीही जिवंत आहोत,” असे ठाम विधान करत भुजबळांनी ओबीसींचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.








