Garba 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना ‘नो एंट्री’!

Notice from Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची सूचना

Nagpur : शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, देवीची आराधना आणि गरब्याचा जल्लोष यासाठी तयारी सुरू आहे. मात्र या उत्सवाआधीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एक सूचना दिली आहे. “गरबा उत्सवात फक्त हिंदूना प्रवेश द्या, मुस्लिमांना एंट्री नको,” अशी स्पष्ट सूचना नागपूरमधील गरबा आयोजकांना देण्यात आली आहे.

गरब्यासाठी प्रवेश देताना प्रत्येक सहभागीचे आधार कार्ड तपासा, त्यानंतरच प्रवेश द्या, असे विहिंपने सांगितले आहे. इतकेच नव्हे तर “जर कोणता मुस्लिम तरुण गरब्यात प्रवेश घेताना आढळला, तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा. नाहीतर आम्ही स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ,” असा इशाराही परिषदेकडून देण्यात आला आहे.

Lathi charge : अंतरवाली लाठीचार्जचा आदेश कुणी दिला सगळ्यांनाच माहिती आहे !

विहिंपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, नवरात्रोत्सव हा देवी आणि शक्तीचा उत्सव असून, हिंदूंसाठी साजरा केला जातो. परंतु, यामध्ये काही मुस्लिम तरुण लपून प्रवेश करून गरबा खेळतात, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आयोजकांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नवरात्रोत्सव काळात ठिकठिकाणी आयोजित गरबा कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असतील, अशी माहितीही देण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच, पोलिसांनाही सूचना देण्यात येणार असल्याचे विहिंपकडून सांगण्यात आले. या सूचनेमुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

____