व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bapu Birus son : एवढा मोठा झाला का तू? अंगावर कपडे सुद्धा...

Bapu Birus son : एवढा मोठा झाला का तू? अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही…”

Gopichand Padalkar receives threat from Bapu Birus son : बापू बिरूंच्या मुलाची गोपीचंद पडळकरांना धमकी

Sangli : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापलं असतानाच, आता बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी यांनी त्यांना थेट इशारा देत सज्जड दम भरला आहे.जत तालुक्यातील सभेत पडळकरांनी जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. पडळकरांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे संताप अधिकच वाढला आहे.

शिवाजी वाटेगावकर म्हणाले “जयंत पाटलांविरुद्ध बरळतोस, तुला समाजात काही किंमत नाही. जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव. वाळव्यात यायचा विचार कर, कपडे काढून पाठवतो. एवढा मोठा झाला का तू बापूंवर बोलायला? तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही.” त्यांनी पुढे पडळकरांवर निशाणा साधत म्हटलं “धनगर समाजाची अब्रू घालवली आहेस. बापूसारख्यांवर बोलतोस? जयंत पाटील आलतू-फालतू नाहीत. तुझं राजकारण इथं चालणार नाही.”

St recruitment : एसटीमध्ये मेगाभरती! तब्बल 17,450 चालक, सहाय्यकांची भरती

दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी स्वतः पडळकरांना फोन करून, “अशी विधानं करू नका” अशी सूचना दिल्याचं समोर आलं. फडणवीस म्हणाले “कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल बोलणं योग्य नाही. अशा विधानाचं आम्ही समर्थन करणार नाही.”

Officers scolding : पैसा तुमच्या बापाचा नाही… माज दाखवू नको !

स्वतः पडळकरांनीही मान्य केलं की, “फडणवीस साहेबांचा मला फोन आला. त्यांनी सूचना दिल्या आहेत आणि त्या मी पाळणार आहे.” पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभरात टीका, निषेध आणि आंदोलन सुरू असून आता त्यांच्याच पक्षातील नेते त्यांना आवर घालतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

____

error: Content is protected !!