Go to work with employment guarantee, Dhasa’s eloquent answer : रोजगार हमीच्या कामावर जा, दस देणार ‘खुमासदार’ उत्तर
Mumbai : रायगडमधील सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी “आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या” असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावत मुंडे पुन्हा मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याची चर्चा रंगली. परंतु या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली असून मनोज जरांगे, आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले.
मनोज जरांगे पाटील यांनी “रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं, बाराशी खांदायला” अशा शब्दांत पलटवार केला. त्यांनी पुढे चेतावणी देत सांगितले की, मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपेल. तसेच छगन भुजबळांवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला आणि ओबीसी समाजाच्या वाटोळ्याचा ठपका ठेवत “पापाचा घडा भरला आहे, अजून भोगावे लागेल” असे तीव्र वक्तव्य केले.
Sanskriti Bachao Morcha : एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर रणांगणात या
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी या वक्तव्यावर तातडीने भाष्य करण्यास नकार दिला. “पूरग्रस्तांमुळे मी आज बोलणार नाही, पण दोन दिवसांत खुमासदार उत्तर देईन” असे ते म्हणाले.
Election of Teacher Constituency : शिक्षण क्षेत्रातील नेते आजमावणार राजकीय भवितव्य!
तर अंजली दमानिया यांनी थेट टीका करत “धनंजय मुंडेंना जनतेच्या कामापासून दूर ठेवावे. पक्षबांधणी, स्थानिक निवडणुका अशी कामे त्यांच्याकडे आहेत, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे” असे स्पष्ट मत मांडले. धनंजय मुंडेंच्या एका वाक्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांकडून तीव्र प्रतिकार सुरू आहे.
____








