Ravikant Tupkar : माझे फोन टॅप होत आहेत, मी सरकारच्या नजरकैदेत

Farmer leader alleges that the government tapped phones : देशात अघोषित आणीबाणी, रविकांत तुपकरांचे गंभीर आरोप

Buldhana शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करत जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. “सरकार आमच्या हालचालींवर रडार ठेवते, आमचे फोन टॅप केले जातात, पोलीस आमच्या मागावर असतात. त्यामुळे आम्हाला नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणूक दिली जाते”, असा दावा त्यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तुपकर यांनी पुन्हा सरकारवर तोफ डागली. त्यांनी म्हटले की, “सरकारकडून फोन टॅपिंग व इतर बाबींविषयी आम्हाला नोटिफिकेशन येतात. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरीही नेपाळसारखे रस्त्यावर उतरतील आणि मंत्र्यांना ‘तुडवू तुडवू’ हाणतील.”

Makrand Patil : १.८० लाख शेतकऱ्यांना मिळणार १२१ काेटींची मदत

बुलढाणा जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, मदत न देता लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेळावे घेत आहेत, अशी टीका तुपकरांनी केली. “कर्जमाफीचे आश्वासन देतात पण पूर्ण करीत नाहीत, सोयाबीन-कापसाला भाव नाही. हा असंतोष आता उफाळून येणारच आहे,” असे ते म्हणाले.

Matang community : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही सरकारकडून विलंब

तुपकरांनी पुढे म्हटले की, “१९७८ मध्ये आणीबाणी जाहीर झाली होती, पण आज देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. आम्हाला तुरुंगात टाका, कितीही कारवाई करा, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहणार. राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद सुरू झाला की, युगपुरुष जन्म घेतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा असंतोषही लवकरच बाहेर पडेल आणि परिस्थिती नेपाळसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”