Raj and Aditya Thackeray’s request for help from the Chief Minister : राज व आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
Mumbai : महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात प्रचंड हानी केली आहे. शेती, जनावरे, घरे, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. सरकारने 2200 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असली तरी, या मदतीवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही मदत तुटपुंजी असून ती पुरेशी ठरणार नाही, अशी टीका करण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे पत्र लिहून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अतिवृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगत त्यांनी सरकारकडे पाच महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे, एकरी किमान 30 हजार रुपये नुकसानभरपाई देणे, केंद्राकडून विशेष मदतीचे पॅकेज मिळवणे, मुलांचे शिक्षण खंडित होऊ न देणे, आरोग्य विभाग सज्ज ठेवणे आणि बँकांच्या वसुलीला लगाम घालणे या प्रमुख मागण्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे आपले कर्तव्य मानावे. जाहिरातबाजी टाळून प्रत्यक्ष मदत दिली पाहिजे. एकरी किमान 30 ते 40 हजारांची मदतच शेतकऱ्यांना उभं करू शकेल.”
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तातडीने मदत व कर्जमाफीची मागणी केली आहे. समाज माध्यमातून त्यांनी हे पत्र शेअर करत सरकारने घोषणांच्या पलीकडे जाऊन ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
March is violent : ७ आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण !
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले असून पुढील काही दिवसांत सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.