Heavy rainfall likely till September 29 : २९ सप्टेंबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता
Pune : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात २९ सप्टेंबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात नद्यांची पाणीपातळी वाढून पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्याने पुन्हा एकदा राज्यभर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
२७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन केवळ अधूनमधून सरी पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. “पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सुधारेल,” अशी शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत.
Farmers angry : ८ दिवस कुठे होतात? दौरा अर्धवट सोडून माघार !
राज्यात आधीच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असताना, पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.