Special Session : विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी !

Vijay Vadettiwar appeals to Governor for farmers affected heavy rains and floods : अतिवृष्टी-पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विजय वडेट्टीवारांची राज्यपालांकडे धाव

Mumbai : महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये झालेल्या विक्राळ अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांकडे तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

वडेट्टीवार यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, तब्बल चार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्याने शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे श्रम मातीमोल झाले आहेत. या हंगामात पाच टक्के देखील उत्पादन मिळणे कठीण झाले आहे.

Asia Cup 2025 : निर्लज्जपणाचा कळस ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाला मोहसीन नक्वी !

पूरामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली, जनावरे वाहून गेली, पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या, रस्ते आणि वीजपुरवठा खंडित झाला असून पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

या गंभीर पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची, बाधित शेतकरी, कामगार आणि नागरिकांसाठी सरसकट आर्थिक मदत व पुनर्वसन पॅकेज देण्याची, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करण्याची तसेच पिकांचे व मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Ladki bahan Yojana : तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणीची पायपीट

राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपालांनी सरकारला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचा आग्रह करावा, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली आहे.