Crop Inspection Deadline : आता ३१ ऑक्टोबरपर्यंत होणार पीक पाहणी !

The Revenue Department has directed district collectors to conduct crop inspections in October : महसूल विभागाचा निर्णय, ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Mumbai : यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. याशिवाय दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर ओढवले होते. या कारणांमुळे पीक पाहणीचा कार्यक्रम यापूर्वी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार पीक पाहणीची मुदत काल (३० सप्टेंबर) संपली. पण आता पीक पाहणीची मुदत पुन्हा एक महिना वाढवण्यात आली आहे. महसूल विभागाने हा निर्णय जाहीर केला.

१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. सहायक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाने खरीप हंगाम २०२५ मधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काल तसे निर्देश दिले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता.

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला बनावट !

वाढवण्यात आलेल्या कालावधीनुसार शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. आता या महीन्यात ज्या गावांतील पीक पाहणी झाली नाही, त्या गावांतील पाहणी सहाय्यकांमार्फत पूर्ण करायची आहे. सर्व सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करावी आणि देनंदिन आढावा घ्यावा, असे सुचवण्यात आले आहे.

Vidarbha Farmers : १९८ शेतकऱ्यांचा ‘जलसमाधी’चा इशारा!

बहुतेक वेळा गावांपासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते आणि शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सदर पाहणी सहाय्यकांमार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे. सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची १०० टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी करणे अनिवार्य आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद ७/१२ उताऱ्यावर येते. त्यामुळे १०० टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सुचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.