व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र duasehra melava : त्यांना हिंदू संस्कृती माहिती नाही, चिखलात लोळवायलाच हवं

duasehra melava : त्यांना हिंदू संस्कृती माहिती नाही, चिखलात लोळवायलाच हवं

Sanjay Rauts counterattack on the backdrop of Dussehra gathering : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा पलटवार

Mumbai : आज महाराष्ट्रात विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस असून राज्यभरात विजयादशमीचे विविध कार्यक्रम रंगत आहेत. सकाळी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडला. भगवानगडावर पंकजा मुंडे आणि नारायगडावर मनोज जरांगे-पाटील आपले विचार मांडणार आहेत. तर संध्याकाळी मुंबईत दोन्ही शिवसेनांचे दसरा मेळावे होणार असून, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, उद्धव सेनेच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी दादर येथील शिवतीर्थावर अतिवृष्टीमुळे पाणी आणि चिखल साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा ही परंपरा आहे. पाऊस, वारा, वादळ, चिखल काहीही असो निष्ठावंत शिवसैनिक विचारांचं सोनं लुटायला शिवतीर्थावर पोहोचतीलच.”

Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !

शिंदे गटाने उद्धव सेनेच्या सभेवर टीका करताना “तेथे फक्त चिखलफेक होते, विचारांचं सोनं मिळत नाही” असा टोला लगावला. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले “चिखल फेकणार आहोत, चिखल फेकायलाच पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीत शिमगा, चिखलाशी संबंधित अनेक उत्सव आहेत. त्यांना हिंदू संस्कृतीची माहिती नाही. म्हणूनच शिवपार्कातील चिखलात त्यांना लोळवायलाच हवं.

RSS Utsav : आपण एकटे जगू शकत नाही, पण निर्भरता नाईलाज होऊ नये !

“आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे होत आहेत. या गद्दारांना मोदी-शहांचे पाठबळ आहे. त्यांच्या मदतीने त्यांनी शिवसेना चोरली.” मनसेसोबतच्या युतीबाबत संकेत
दसरा मेळाव्यात मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य होणार असल्याचे राऊतांनी सूतोवाच केले. ते म्हणाले “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा संवाद आणि भेट झाली आहे. ग्राऊंड लेव्हलवर दोन्ही पक्षांतर्फे तयारी सुरू आहे. मात्र अंतिम भूमिका दोन्ही पक्षांचे प्रमुखच मांडतील.”
संध्याकाळी होणाऱ्या दोन्ही शिवसेनांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष लागलेले आहे.

____

error: Content is protected !!