Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता? अमित शाहांच्या दौऱ्यावर अवलंबून होते का?

Allegation of Delay in Sending Proposal for Farmers’ Assistance : मुख्यमंत्र्यांना ‘सुरजागड खाणीतून मलई’ मिळविण्यातच रस, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

Akola राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात असताना भाजप-युती सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झालेले असतानाही “महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ” असे सांगणे हा सरकारचा वेळकाढूपणा आणि असंवेदनशीलतेचा नमुना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याआधीच केंद्र सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

अकोला येथे पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे अमित शाहच घेतात. तेच प्रत्यक्षात ‘सुपर मुख्यमंत्री’ आहेत. त्यामुळे त्यांनीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करायला हवी होती. मात्र त्यांनी ते केले नाही. मुख्यमंत्री दिल्लीला गेले पण शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव न नेता, सुरजागड खाणीतून अधिक मलई कशी मिळवता येईल याचाच प्रस्ताव घेऊन परतले,” अशी टीका त्यांनी केली.

Severely Hit by Heavy Rainfall :अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका; ३४ जिल्ह्यांतील ६९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, “भाजपच्या हुकूमशाहीविरोधात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे तसेच संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा त्यामागचा संकल्प आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आघाडीचा निर्णय आता स्थानिक स्तरावर घेण्याचे अधिकार दिले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Local Body Elections : मोर्शी व अचलपूरमध्ये पुन्हा महिलांना संधी, सलग दुसरी वेळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पातूर नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष हिमायत खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पातूर शहर अध्यक्ष शाकीर हुसेन उर्फ गुड्डू पहलवान, मेहताब रऊफ, अनिकभाई पटेल, इसामोद्दीन उर्फ मुन्ना मेडिकल, शारिक शाबीर, नईम यासीन, रफीक भाई, राहुल वाघमारे तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.